…म्हणून अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा केला दावा दाखल

मुंबई: अमृता फडणवीस यांच्याबद्दल प्रतिक्रीया देत असताना राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवणार आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अमृता फडणवीस यांनी चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “आपल्याच सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी अवमान करते. ती आहे विद्या चव्हाण, आता कोर्टात जाऊन साफ करावी लागेल ही सगळी विषारी घाण, विद्या चव्हाण ही मानहानीची नोटीस वाच आणि सुधार स्वतःला मगच मिळेल तुला निर्वाण!”, असं ट्विट करत त्यांनी नोटीसही धाडली आहे.

भाजप मीडिया सेल प्रभारी असलेल्या जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोटो ट्विट केला. त्याला मराठी राबडीदेवी, असं कॅप्शन दिले होते. याला आक्षेपार्ह म्हणत मुंबई पोलीसांच्या सायबर सेलने गजारिया यांना नोटीस धाडली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया दिली. याबद्दल बोलताना अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या सर्व गोष्टींचा संबंध अमृता फडणवीस यांच्याशी जोडल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले.

अमृता फडणीस यांनी विद्या चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि सुनेचा मानसिक छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी माझ्या प्रतिमेवर आक्षेप घेतला आहे. मला डान्सिक डॉल म्हटले आहे. आज समाजात मल्टीटास्किंग असणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्यांनी अनादर केला आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!