ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई, सीबीआयचे 20 राज्यात 56 ठिकाणी छापे
मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणा सध्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आज सीबीआयने ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी 20 राज्यात 56 ठिकाणी छापे टाकले आहे. इंटरपोलच्या माहितीनंतर सीबीआयची देशभरात छापेमारी करत ही मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या धडक कारवाईला ‘ऑपरेशन मेघदूत’ असं नाव दिलं आहे.
इंटरपोलकडून इनपुट मिळाल्यानंतर सीबीआयनं देशभरात कारवाईला सुरुवात केली आहे. सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई केवळ चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधितच नाही, तर याचा संबंध लहान मुलांना फिजिकल ब्लॅकमेल, लहान मुलांचं शारीरिक शोषण या प्रकरणाशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळीकडून वेगवेगळे ग्रुप बनवून आणि वैयक्तिक पातळीवर काम सुरु होतं.
सीबीआयला मिळाली ‘ही’ माहितीइंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला सिंगापूरमधून या प्रकरणी माहिती मिळाली. त्यानंतर सीबीआयकडून देशभरात छापेमारी करत कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयकडून महाराष्ट्रासह दिल्ली, बंगळुरू, पाटणा अशा 20 राज्यांमध्ये छापसत्र सुरु आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ऑपरेशन कार्बन होते.