शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली त्या बंडखोरीमागचा सूत्रधार कोणतरी तिसरीच व्यक्ती – अजित पवार

पिंपरी -चिंचवड आणि कसबा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. आज यासंदर्भात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी औरंगाबाद येथील पैठण दौऱ्यावर दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेनेमध्ये जी बंडखोरी झाली त्या विषयी मला जी माहिती आहे त्यानुसार आदित्य ठाकरे सोमवारी तिथे येणार आहेत. सचिन अहिर देखील बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते.बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणतरी तिसरीच व्यक्ती आहे कारण बंडखोरी झाल्यामुळे मताची विभागणी होऊन त्याचा फायदा इतर पक्षाला व्हावा म्हणून देखील कोणीतरी हे करण्याचा प्रयत्न केला असावा असा माझा अंदाज आहे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.
अजित पवार पुढे ते म्हणाले, मी तिथे गेल्यावर स्वतः या सर्व गोष्टींची माहिती घेईनच आणि हे जरी कोणी केलेलं असेल तर स्वतः उद्धव ठाकरे साहेब ,आदित्य ठाकरे आणि शिवसेना हे स्पष्टपणे त्यांच्या मतदारांना आव्हान करतील व विश्वास देतील की तिन्ही पक्षांचा आणि मित्र पक्षांचा मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आहेत आणि त्यांनाच मतदान करावे असे आवाहन ते करतील, असे अजित पवारांनी सांगितले.