भारतीय संविधान दिनानिमित्त आज भाजपच्या कार्यालयात चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

26
पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त आज भाजपच्या २४ तास खुल्या कोथरूड मंडल कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाचन करण्यात आले. तत्पूर्वी संविधानाचे शिल्पकार वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिनादन केले.
चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क देणाऱ्या संविधान दिनानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे पूजन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सर्वांनी संविधानाचं वाचन करुन शपथ घेतली.
त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यालयातील अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त पक्षाचे मंडल स्तरावरील पहिले कार्यालय उभारल्याबद्दल बावनकुळे यांनी दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड (द) मंडलाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्यासह मा. नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.