डॉ. सुनील देशपांडे यांच्या जीवनकार्यावरील ‘ध्येय साधनेच्या मार्गावर’ पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन उत्साहात संपन्न

6

पुणे : सेवावर्धिनी मेळघाट सपोर्ट ग्रुपच्या वतीने प्रकाशित आणि लेखिका माधुरी साकुळकर लिखित, स्वर्गीय डॉ. सुनील देशपांडे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ध्येय साधनेच्या मार्गावर’ या पुस्तकाचे भव्य प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाले. डॉ. देशपांडे यांचा ध्येयवादी जीवनप्रवास आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजातील प्रत्येक घटकासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमादरम्यान, बांबूपासून अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ‘सृष्टीबंध’ राख्यांचे अनावरणही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मेळघाट परिसरातील नागरिकांच्या कलाकुसरीला आणि पर्यावरणपूरक संकल्पनांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला आहे.

याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वर्गीय डॉ. सुनील देशपांडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी आणि एका ध्येयासाठी समर्पित केले. त्यांच्या या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा परिचय करून देणारे ‘ध्येय साधनेच्या मार्गावर’ हे पुस्तक नव्या पिढीला समाजकार्याची मोठी प्रेरणा देईल. तसेच, बांबूपासून तयार केलेल्या ‘सृष्टीबंध’ राख्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश समाजात जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी आकांक्षा सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती राणी चौरे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष निरुपमा देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.