राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कोथरूडमध्ये महिला उद्योजकांच्या प्रदर्शनाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

7

पुणे : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त कोथरूड येथे ‘घे भरारी’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला उद्योजकांच्या उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे भव्य उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. कोथरुडमधील कर्तबगार महिला भगिनींच्या कौशल्याला आणि मेहनतीला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या भगिनींच्या अंगभूत कौशल्याला आणि परिश्रमाला योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांचा आत्मनिर्भरतेचा प्रवास अधिक गतिमान व बळकट व्हावा, हीच या उपक्रमामागची मुख्य भावना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने बळ देणारा ठरत आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व उद्योजक भगिनींचे कौतुक करत पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, आपल्या भगिनींच्या आत्मनिर्भरतेच्या या प्रवासात आम्ही सदैव सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या उद्घाटन सोहळ्याला ‘घे भरारी’ संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण व हस्तकला उत्पादनांना कोथरूडकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.