भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि स्थानिक नगरसेवक अमर आवळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

10

पुणे : पुणे शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वतीचे नगरसेवक धीरज घाटे आणि स्थानिक नगरसेवक अमर आवळे यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या .

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आणि दोन्ही लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या नव्या कार्यालयाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या मध्यवर्ती आणि अद्ययावत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होईल. नागरिकांना आपल्या अडीअडचणींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांना अधिक सक्षम, गतिमान आणि तत्पर सेवा देणे शक्य होणार आहे, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

नवी पेठ-पर्वती परिसरातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरेल, असे सांगत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि नगरसेवक अमर आवळे यांना त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी आणि जनसेवेच्या या नव्या अध्यायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला परिसरातील नागरिक आणि भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.