पुण्यनगरीत इस्कॉनच्या वतीने भव्य जगन्नाथ रथोत्सव; मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतले महाप्रभूंचे दर्शन

15

पुणे : श्री क्षेत्र पुरी येथील जगप्रसिद्ध रथयात्रेचे औचित्य साधून ‘इस्कॉन’ (ISKCON) संस्थेच्या वतीने पुण्यनगरीत प्रतीकात्मक भगवान जगन्नाथ रथोत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या भव्य रथोत्सवामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले.

रथोत्सवाच्या पवित्र प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भगवान श्री जगन्नाथ, भ्राता बलभद्र आणि सुभद्रा माता यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती केली. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, चौफेर प्रगती आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी महाप्रभूंच्या चरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी रथोत्सवात पुणे आणि परिसरातून हजारो विठ्ठल-जगन्नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्व भाविकांना श्री जगन्नाथ रथोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि भगवान श्री जगन्नाथांची कृपा व आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. संपूर्ण कोथरूड आणि पुणे शहर यावेळी ‘हरे कृष्ण’ आणि ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

या प्रसंगी आ. श्रीकांत भारतीय, निरंजन डावखरे, हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.