शहराला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी इचलकरंजी नागरिक मंच आणि इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

110

इचलकरंजी  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज इचलकरंजी दौऱ्यावर आहेत.  इचलकरंजी शहराला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी, कायम तोडगा काढण्यासाठी  इचलकरंजी नागरिक मंच आणि इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पाटील यांची भेट घेतली.

पाटील यांनी माहिती दिली कि, इचलकरंजी शहराला वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा यासाठी दूधगंगा धरणातील पाणी इचलकरंजी शहराला पुरवण्यासाठी 160 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु या योजनेला कागल तालुक्यातील नागरिकांचा असणारा विरोध लक्षात घेऊन या प्रश्नावर कायमचा तोडगा म्हणून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घ्यावी यासाठी इचलकरंजी नागरिक मंच आणि इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.