इचलकरंजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी व पूर्वतयारीचा आढावा

11

कोल्हापूर : केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या इचलकरंजी येथील नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे चोख नियोजन, सुरक्षेची आवश्यक व्यवस्था आणि व्हीआयपी (VIP) प्रोटोकॉलनुसार करावयाच्या पूर्वतयारीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. या दौऱ्यादरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये, यादृष्टीने त्यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.