चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने रेशनकार्ड दुरुस्ती  होईपर्यंत  लोकसहभागातून धान्य उपलब्ध करून देण्यास सुरुवात

5

पुणे : संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये सांगितले आहे की, ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो…’ म्हणजे सर्वांच्या मंगलइच्छा पूर्ण होवोत. कोथरुड मधील प्रत्येक नागरिकांना इच्छित सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी कोथरूड मतदार संघाचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नेहमीच प्रयत्न असतात. त्यासाठी ते कोथरूडमध्ये अनेक उपक्रम राबवत असतात. यातीलच एक उपक्रम म्हणजे कोथरूडकरांना रेशन कार्ड मिळवून देणे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी शासनाच्यावतीने धान्य मिळत असते. मात्र, अनेकांचे रेशनकार्ड बंद असल्याने किंवा काही त्रुटींमुळे रेशनच्या दुकानातून धान्य मिळत नाही. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी गेल्या वर्षभरापासून मोफत रेशनकार्ड दुरुस्ती केंद्र सुरू केले आहे. याचा अनेकांना लाभ होत आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने; कोथरुडकरांची ही अडचण दूर व्हावी; यासाठी रेशनकार्ड सुरू होईपर्यंत लोकसहभागातून पाटील यांच्या पुढाकाराने धान्य उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.