उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची डागडुजी, रंगकाम, सुशोभीकरण आदी कामांचा घेतला आढावा
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतन इमारतींची डागडुजी, रंगकाम, सुशोभीकरण आदी कामांचा आढावा घेतला. मुंबईतील शासकीय निवासस्थान रायगड (अ-6) येथे हि बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनच्या Facelifting च्या अंदाज पत्रकास मान्यता देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने विभागनिहाय संबंधित मुख्य अभियंत्यांच्या देखरेखखाली निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करून गतीने काम पूर्ण करावे असे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.