पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्यरत रहावे, चंद्रकांत पाटील यांचे सांगलीतील कार्यकर्त्यांना आवाहन

21
सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. सध्या ते सांगली जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगली महापालिका स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांची आज सांगलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कार्यरत रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
आ. सुधीर गाडगीळ, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, माजी अध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैशाळकर, नगरसेवक आणि नगरसेविका, स्थानिक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.