उमदी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

89

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते उमदी पोलीस ठाणे अंतर्गत एक पोलीस अधिकारी व ८ पोलीस अमलदारांसाठी नवीन निवासस्थान इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. उमदी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

उमदी पोलीस ठाणे अंतर्गत एक पोलीस अधिकारी व ८ पोलीस अमलदारांसाठी नवीन निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पाटील म्हणाले, पोलीस दलाला अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार कटिबद्ध आहे. या अनुषंगाने, उमदी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.