‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत कोथरूडमध्ये विशेष AI कार्यशाळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवउद्योजकांना शुभेच्छा

6

पुणे  : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत कोथरूड येथील ‘डेस्टिनेशन को-वर्किंग’ येथे ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ अंतर्गत विशेष AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून प्रशिक्षणार्थी आणि नवउद्योजकांशी संवाद साधला.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “बदलत्या तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) हे एक प्रभावी माध्यम बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या तरुणाईला नवनवीन व्यासपीठ आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांमधील आधुनिक कौशल्यांचा विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील.” त्यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी व नवउद्योजकांना त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कार्यशाळेप्रसंगी डेस्टिनेशन को-वर्किंगचे संस्थापक मंदार देवगावकर, भाजप दक्षिण मंडळ अध्यक्ष गिरीश खत्री, महिला मोर्चा दक्षिण मंडळ अध्यक्षा अमृता देवगावकर यांच्यासह आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक विकासासाठी कसा करता येईल, यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.