मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क नियामक प्राधिकरण (ARA) आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

6

मुंबई : मुंबईतील विधानभवन येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क नियामक प्राधिकरण (ARA) आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत प्रामुख्याने कॅप फेरी, संस्थात्मक व व्यवस्थापन कोटा प्रवेश प्रक्रिया, आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून काम करावे आणि कोणत्याही स्तरावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय ठेवावा, अशा स्पष्ट सूचना यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, सहसचिव संतोष खोरगडे, सहासंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.