भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन

8

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारून आज यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे. या विशेष टप्प्यानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या आगामी राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा गौरव करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या एका वर्षात आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भाजप पक्ष संघटनेला संपूर्ण महाराष्ट्रात एक नवी ऊर्जा आणि गती मिळाली आहे. शेवटच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास दृढ करत संघटन विस्तारासाठी आणि पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आपण घेतलेले परिश्रम निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय आहेत.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे राज्यातील भाजप पक्ष अधिक लोकाभिमुख झाला असून, आगामी काळातही त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र अधिक बळकट होऊन यशाची नवी शिखरे सर करेल, असा दृढ विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. मंत्री महोदयांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पुढील प्रदीर्घ राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.