तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सस्नेह सत्कार

9

मुंबई : राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे (DTE) संचालक डॉ. विनोद मोहितकर हे आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. या विशेष प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. मोहितकर यांच्या दीर्घ प्रशासकीय सेवेचा आणि अमूल्य मार्गदर्शनाचा गौरव करत त्यांचा शासकीय निवासस्थानी सस्नेह सत्कार केला. तसेच, त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

डॉ. विनोद मोहितकर यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात तंत्रशिक्षण विभागात अनेक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणले. विशेषतः केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची (NEP) तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व गतिमानता आणणे आणि महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाचा दर्जा जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले हे अमूल्य योगदान विभागाच्या पुढील प्रगतीमध्ये अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी डॉ. विनोद मोहितकर यांच्या संपूर्ण परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.