शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे नुकतेच निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

12

कोल्हापूर : शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाच्या माजी आमदार आणि ‘गोकुळ’ दूध संघाच्या पहिल्या महिला संचालिका संजीवनीदेवी गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी संजीवनीदेवी गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कोल्हापूरच्या सहकार, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात संजीवनीदेवी ताईंनी अत्यंत तळमळीने आणि समर्पित भावनेने कार्य केले. विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली प्रेरणादायी वाट आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे बहुमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ताईंचे जाणे ही कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेवटी, ताईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि गायकवाड कुटुंबीयांना हे मोठे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ईश्वरचरणी केली. या शोककुळ प्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, गोकुळ दूध संघाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.