बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांची हॅट्ट्रिक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

8

पुणे : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांची सलग तिसऱ्यांदा भरघोस मतांनी निवड झाली आहे. या मोठ्या यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. वकिल बांधवांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा दाखविलेला हा विश्वास त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यकर्तृत्वाची आणि समर्पित सेवाभावाची मोठी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्या प्रवासाचा गौरव करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विद्यार्थी परिषदेचे माजी कार्यकर्ते, अभ्यासू कायदे तज्ज्ञ आणि वकिलांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. वकिल बांधवांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा दाखविलेला विश्वास त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि समर्पित सेवाभावाची पावती आहे.

पाटील यांनी अ‍ॅड. वारुंजीकर यांना त्यांच्या पुढील नवीन कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वातून आगामी काळात वकिल बांधवांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील आणि देशातील न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी अधिक प्रभावी व सकारात्मक कार्य घडत राहील, अशी सदिच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.