जत येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक; धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन

12

सांगली : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत येथे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महायुती सरकारच्या विकासाभिमुख कार्याची आणि जनतेच्या विश्वासाची ताकद या निवडणुकीत निश्चितपणे दिसून येईल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. या प्रसंगी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी प्रभावी समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशीलदादा कदम यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी तसेच सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.