कोथरुडमधील नागरिकांसाठी कर्वेनगर येथे नवीन नागरी सेवा केंद्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ज्येष्ठ नागरिकांना परिसरातच मिळणार शासकीय योजनांचा लाभ

8

पुणे : कोथरुड मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि आवश्यक नागरी सुविधांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व जलदगतीने मिळावा, यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. याच उद्देशातून आज कर्वेनगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘नागरी सेवा केंद्राचे’ अधिकृत उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या परिसरातच शासकीय सेवांचा लाभ मिळावा, हा या केंद्रामागील मुख्य हेतू असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. हे केंद्र नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. या नवीन केंद्राच्या माध्यमातून कोथरुड आणि कर्वेनगर परिसरातील नागरिकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, विविध शासकीय योजनांचे अर्ज आणि पालिकेशी संबंधित नागरी सुविधा एकाच छताखाली अतिशय जलद गतीने उपलब्ध होणार आहेत.

या जनसेवा कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाला नगरसेविका रेश्मा बराटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवरामपंत मेंगडे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.