कोथरूडमध्ये दोन दिवसीय मोफत कायदेशीर सल्ला शिबिराचे उद्घाटन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

7

पुणे : अंकुर प्रतिष्ठान आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी परिसरातील नागरिकांच्या विविध कायदेविषयक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत कायदेशीर सल्ला शिबिराचे उद्घाटन आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोथरूड येथे संपन्न झाले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक नागरिकांना मालमत्ता, सहकारी गृहनिर्माण संस्था, दस्तऐवज, वारसा, करार तसेच इतर कायदेशीर बाबींमध्ये योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. अशा वेळी तज्ज्ञ विधिज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणे ही अत्यंत उपयुक्त बाब आहे. त्यामुळे कोथरूडमधील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या कायदेशीर समस्यांचे समाधान करून घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने पाटील यांनी केले.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या संयोजिका आणि नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, कुलदीप सावळेकर, प्रभाग अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, ॲड. प्राची बगाटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.