विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावून विभागाचे काम अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्यावर भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

6

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षण विभागाची एक सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रलंबित विषयांचा सखोल आढावा घेऊन, सर्व प्रकरणांवर निश्चित कालमर्यादेत तातडीने तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध योजना, प्रशासकीय कामकाज तसेच प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावून विभागाचे काम अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्यावर भर द्यावा, अशा सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

​या महत्त्वपूर्ण बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.