दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ वारंगा, नागपूर परिसराच्या बांधकामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत, शैक्षणिक व क्रीडा संकुल, आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, अतिथीगृह, मंदिर, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच विद्यापीठ परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याचा चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या. दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव प्रताप लुबाळ, कवी कुलूगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे रजिस्ट्रार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.