पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विटा येथे आवाहन

4

सांगली : आगामी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विटा तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. या निवडणुकीत पात्र मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपला हक्काचा सहभाग नोंदवण्यासाठी मतदार नोंदणी ही अत्यंत महत्त्वाची आणि प्राथमिक पायरी आहे. त्यामुळे विटा परिसरातील सर्व पात्र नागरिकांनी व सुशिक्षित मतदारांनी मोठ्या संख्येने आपली मतदार नोंदणी करून घ्यावी आणि या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांच्या संस्थाचालकांना आणि पदाधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदार नोंदणी मोहीम राबवण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार सदाशिव पाटील, आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वैभव पाटील, विलास काळेबाग, अंबिका हजारे, सचिन शिंदे, किरण तारळेकर, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.