ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. वाय. पाटील यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निवासस्थानी भेट अन् श्रद्धांजली

5

कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने अमूल्य योगदान देणारे, समाजकारण व सार्वजनिक जीवनात आपल्या अद्वितीय कार्याचा ठसा उमटविणारे आदरणीय डी. वाय. पाटील जी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्यातून हरपले आहे.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील जी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच, पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या दुःखद प्रसंगी धीर दिला. या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थित राहून आदरणीय डी. वाय. पाटील जी यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण केली.

यावेळी भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “डी. वाय. पाटील जी यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून समाजातील असंख्य पिढ्या घडविण्याचे महान कार्य केले. त्यांनी समाजहितासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांची सेवाभावी वृत्ती सदैव सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांचे जाणे ही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी आहे.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्रीमंडळातील सहकारी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, महायुतीतील पदाधिकारी  उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.