राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कौशल्य विकासाला दिलेले सर्वोच्च प्राधान्य हे देशाच्या शिक्षणव्यवस्थेला रोजगाराभिमुख आणि भविष्यकालीन बनविणारे आहे – मंत्री चंद्रकांत पाटील

6

पुणे : पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या कुलपतीपदी डॉ. स्वाती मुजुमदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच अत्याधुनिक ‘GTC-ICE’ सेंटरचे उद्घाटन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कौशल्य विकासाला दिलेले सर्वोच्च प्राधान्य हे देशाच्या शिक्षणव्यवस्थेला रोजगाराभिमुख आणि भविष्यकालीन बनविणारे आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिपादन केले.

यावेळी पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी देशातील कौशल्याधारित शिक्षणाची गरज ओळखून उभारलेले हे विद्यापीठ आज नव्या पिढीला कौशल्य, ज्ञान आणि रोजगाराच्या संधी देणारे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींपर्यंत कौशल्याधारित शिक्षण पोहोचवणे आणि स्किल-बेस्ड रोजगाराला समाजात प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळवून देणे, ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील युवा शक्तीला या संधींचा जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू, असे पाटील म्हटले.

या प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा, पद्मभूषण डॉ. एस. बी. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर, कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.