सोमेश्वरवाडी येथील निकास स्काईस सोसायटीने लोकसहभागातून सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील सोमेश्वरवाडी येथील निकास स्काईस सोसायटीने लोकसहभागातून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पाटील यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, पर्यावरण संवर्धनासोबतच स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी अशा लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या उपक्रमांचे निश्चितच कौतुक आहे. नागरिकांच्या पुढाकारातून निर्माण होणारे हे ऊर्जा स्वयंपूर्णतेचे मॉडेल इतर सोसायट्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी नगरसेविका मयूरी कोकाटे, रोहिणी चिमटे, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.