पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमध्ये अंगणवाडी सेविकांचा गौरव; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सेवा उपक्रमांचे आयोजन

6

पुणे, ०१ ऑक्टोबर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्यांतर्गत आज, ०१ ऑक्टोबर रोजी कोथरूड मतदारसंघातील विविध भागांमध्ये विशेष सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील गुरू गणेशनगर आणि उत्तर मंडलातील म्हाळुंगे येथे उपस्थित राहून बालकांच्या भवितव्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा भावपूर्ण सन्मान केला आणि त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्यापासून, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे, त्यांचे पोषण आणि सर्वांगीण विकासापर्यंत अंगणवाडी सेविका सातत्याने अतिशय मोलाचे योगदान देत असतात. या सेविकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी माझ्यासाठी अत्यंत विशेष होती, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, बालकांच्या उज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या या भगिनींच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली सर्वांचीच सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या दोन्ही भव्य कार्यक्रमांना कोथरूडमधील भाजपचे प्रमुख लोकप्रतिनिधी आणि महिला मोर्च्याच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे महिला मोर्चा अध्यक्षा मनिषा लडकत, नगरसेविका वृंदा गणात्रा व रोहिणी चिमटे, भाजप कोथरूड दक्षिण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा अमृता देवगावकर, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजप नेते गणेश कळमकर, ज्योती कळमकर, प्रमोद आण्णा निम्हण, प्रकाशतात्या बालवडकर, प्रभाग अध्यक्षा प्राची बगाटे, उपक्रम प्रमुख अपर्णा लोणारे, संगीता वांद्रे, गायत्री लांडे, सचिन दळवी, सुभाष भोते, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, वैदेही बापट, यामिनी मटकरी, निकीता माथाडे, जागृती विचारे, रिना पाडाळे, राकेश पाडाळे आणि अनिकेत चांदेरे यांच्यासह अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, अंगणवाडी सेविका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.