दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘उत्सवमूर्ती सन्मान स्पर्धा’ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न
पुणे : पुणे येथे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘उत्सवमूर्ती सन्मान स्पर्धा’ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना सामाजिक प्रबोधनाची आहे. गंदा ध्वनिप्रदूषणाविषयी अधिक चर्चा झाली. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शहरात विसर्जन मिरवणुकीत आवाजाची पातळी ११० डेसिबलपर्यंत पोहोचली. न्यायालयाचा अवमान करणान्यांवर आगामी काळात कारवाई होऊ शकते, याचे भान मंडळांनी राखले पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मांडले.
‘लोकमान्य’चे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन झगडे, परीक्षण मंडळाचे प्रमुख, इतिहास अभ्यासक व लेखक प्रा. डॉ. गणेश राऊत, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी या वेळी उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुनीत बालन उपस्थित राहू शकले नाहीत.
यावेळी पाटील म्हणाले, ८५ ‘स्पीकरचा आवाज डेसिबलच्या वर गेला तर कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असतानाही पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आवाजाची पातळी १०५ ते ११० डेसिबलपर्यंत पोहोचली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ‘आम्हाला काय करायचे तेच आम्ही करणार, अशी भूमिका घेताना होणाऱ्या परिणामांची काळजीसुद्धा त्यांनी केली असेलच, असे पाटील म्हणाले. मंडळांचे कार्यकर्ते तरुण असतात. अशा वेळी गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो,’ असेही पाटील म्हणाले.
‘३६ तास मिरवणूक चालल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. पितृपंधरवडा सुरू होण्याआधीच विसर्जन व्हायला हवे. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. नैतिक पत्रकारिता जपल्याबद्दल आणि सामाजिक बांधिलकीतून उत्सवमूर्ती सन्मान उपक्रम राबविल्याबद्दल पाटील यांनी महाराष्ट्र टाइम्सचे कौतुक केले.
गणेश मंडळांचे सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक देखावे आणि समाजप्रबोधनपर कार्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या मंडळांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच आगामी वर्षातील गणेशोत्सवासाठी आणि भावी उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.