पुण्यात ‘बालक-पालक’ प्रकल्पाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोहळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुढील वाटचालीस शुभेच्छा

4

पुणे : समाजातील गरजू आणि वंचित बालकांना मायेचा आधार देत त्यांच्या आयुष्याला एक नवी व सकारात्मक दिशा देणाऱ्या उमेद फाऊंडेशन संचलित ‘बालक-पालक’ प्रकल्पाच्या सातव्या वर्धापन दिनाचा विशेष सोहळा पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून प्रकल्पाच्या अविरत सेवाकार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

बालकांचे योग्य संगोपन आणि त्यांना मिळणारा मायेचा आधार हाच उद्याच्या सक्षम समाजाचा पाया असतो. उमेद फाऊंडेशनने गेल्या सात वर्षांत ‘बालक-पालक’ प्रकल्पाच्या माध्यमातून बालकांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. याप्रसंगी भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, समाजातील गरजू बालकांना हक्काचा आडोसा देऊन त्यांच्या पंखांना बळ देण्याचे हे लोककल्याणकारी कार्य असेच निरंतर आणि अविरतपणे सुरू राहावे, हीच सदिच्छा आहे.

या गरिमामयी वर्धापन दिन कार्यक्रमास सत्यजीत बढे, ॲड. प्रशांत जाधव, मिनाताई लेले, राकेश सणस, जयंतराव पारखी यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.