पंतप्रधानांच्या २५ वर्षांच्या विकासप्रवासाची विशेष प्रदर्शनी; मंत्री चंद्रकांत पाटील व मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

5

पुणे : पुण्यातील सेवा संकल्प अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देत, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या २५ वर्षांच्या सेवाभावी कारकिर्दीतील विविध विकासकामांचा आणि परिवर्तनाचा प्रवास उलगडणारी विशेष प्रदर्शनी पुणे भाजपाच्या वतीने उभारण्यात आली आहे. या विशेष प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

मोदीजींच्या कार्याचा आणि देशाच्या ऐतिहासिक विकासयात्रेचा हा प्रवास पुणेकर नागरिकांसाठी निश्चितच अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि देशात झालेले मोठे बदल सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा मानस आहे.

या महत्त्वपूर्ण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही प्रदर्शनी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.