पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला दिली भेट

13

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांशी संवाद साधत पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा केली. महायुतीची एकजूट, समन्वय आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर या निवडणुकीत यश संपादन करण्याचा विश्वास असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

या प्रसंगी मंत्री दत्तात्रय भरणे, शहराध्यक्ष तथा आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार महेशदादा लांडगे, शिवाजीराव अढळराव पाटील, प्रदीप कंद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.