मुंबई भाजपचा नवीन चेहरा कोण ?

सलग दोनवेळा अध्यक्ष पद भूषविलेल्या आमदार आशिष शेलार यांचा कार्यकाळ जून मध्ये संपत आहे. आशिष शेलार यांच्या जागी मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी अनेक दिग्गज नेते प्रतीक्षेत आहेत ज्यामध्ये आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी, योगेश सागर तसेच लोकसभा लढविलेले मनोज कोटक यांची नावे पुढे आहेत. पण वरिष्ठांमध्ये कोटक यांच्या नावाला पसंती असल्याचे मानले जाते. त्यामुळे आता मुंबई मध्ये नवीन चेहरा मिळणार कि विशेष ठराव करून मुंबईचा गड शेलारांच्या कडेच राहणार हे लोकसभा निकालानंतर कळेल.