मोठी बातमी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे.
कालच राज ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे पुण्याचा दोन दिवसीय दौरा रद्द केला होता. त्यामुळे मनसेचा पुण्यातला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना ताप आल्याने सर्व कार्यक्रम पुढे ढकलले. 24 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर जाऊन भेट देणार होते तर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा ही राज ठाकरे घेणार होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.
Read Also :
-
आर्यन खानच्या अडचणीत वाढ; एनसीबीकडून बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात
-
मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव असेल तर त्याविरोधात भाजप आंदोलन करेल; आशिष शेलार…
-
इंधन दरवाढीचा भडका! ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास महागणार
-
महागाईचा भडका, तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतही वाढली
-
मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द; राज ठाकरे आजारी असल्यानं निर्णय