नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, पुढची कथा मी सांगणार – संजय राऊत
मुंबई: एनसीबी पंच प्रभाकर साईल यांनी खळबळजनक खुलासा केल्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते यांनी इंटरवलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला. तसंच, सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी असल्याचं देखील राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मनी लाँड्रिंग आहे आणि याची ईडीने चौकशी करावी, असं देखील राऊत म्हणाले. मी जो व्हिडिओ शेअर केला आहे, यात काळ्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती बाजूला बसली आहे. ती व्यक्ती सॅम डिसुजा आहे.
तो मनी लाँड्रिंगच्या खेळाचा मुंबईतील मोठा खिलाडी आहे. तो तिथे बसल्याचं दिसतंय. तो आत का बसला आहे? असा सवाल करत हा एक मोठा खेळ असून आता खेळाला सुरुवात झाली आहे, असं राऊत म्हणाले. तसंच, वसुली गँग कुणाच्या होत्या. इंटरवलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरवलनंतरची कथा, स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं राऊत म्हणाले.
या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. हे केवळ मुंबईपुरतं नाही आहे तर, दिल्ली पर्यंत याचे धागेदोरे आहेत. जो खुलासा या मुलाने केला आहे, त्याने देशावर उपकार केले आहेत. त्याच्या हिंमतीला दाद देत राऊत यांनी हीच खरी देशभक्ती आहे, असं म्हमत पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे.
Read Also :
-
हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रातल्या 3 ट्रेकर्सचा मृत्यू; 10 जणांना रेस्क्यू…
-
पती समीर वानखेडेवर टीका करणाऱ्याला क्रांती रेडकरचे प्रत्युत्तर; म्हणाली…
-
आपल्या हिंदू मानबिंदुंची पुन:स्थापना म्हणजे राम मंदिर उभारणी – चंद्रकांत पाटील
-
बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी औरंगाबादचं नाव बदललं –…