नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडे विरोधात पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं – देवेंद्र फडणवीस
मुंबई: आर्यन खान प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहे. त्यातच मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वारंवार आरोप करताना दिसत आहेत. आजही मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
पक्षनेते देवेंद्र म्हणाले की, नवाब मलिकांकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कुठल्याही तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या लक्ष्य करणं योग्य नाही. तुमच्याजवळ काही पुरावे असतील तर तुम्ही न्यायालयाला दिले पाहिजे. प्रकरण चालू आहे असताना संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती बाहेर बोलतो पण न्यायालयात मात्र पुरावे देत नाही, हे अतिशय चुकीचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
जे काही चाललं आहे त्यामध्ये खटल्यातील साक्षीदार आहेत त्यांची विश्वासार्हता खराब करायचं काम जर सरकारी यंत्रणांद्वारे व्हायला लागलं तर यापुढे कुठलीच केस कुठेच टिकणार नाही. तसंच, एक नवीन चुकीची पद्धत या ठिकाणी तयार होईल, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडे काही पुरावे असतील ते न्यायालयात सादर केले पाहिजेत. दुसरीकडे वानखेडेंच्या पत्नीने सगळे पुरावे दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read Also :
-
पुण्यात विदेशी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी; फटाके विक्रीसाठी परवाना आवश्यक
-
एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज सांयकाळी 7 वाजता होणार जाहीर
-
मी केलेले आरोप जर खोटे असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे – नवाब मलिक
-
भाजपला मोठा धक्का; उल्हासनगरमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
-
तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना…