मोठी बातमी: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई: राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक नियमांत शिथिलता आणली गेली. मात्र, कोरोनाचा धोका कायम आहे. काही ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, असं ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. तसेच, “नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे”, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असं कुठलंही प्रकरण घडलेलं नव्हतं. देशात आणि राज्यात आता कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. संसर्ग संख्याही दिवसेंदिवस घसरत आहेत आणि कोरोना लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
मात्र, आता दिवाळीच्या तोंडावर कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असता राजकीय नेत्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. दुसरीकडे, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र, आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Read Also :