अश्रू ढाळू नका, काय पावलं उचलणार ते सांगा; नगर अग्नितांडवावरुन ‘सामना’तून संजय राऊतांनी सरकारलं सुनावलं
मुंबई: अहमदनगरच्या इस्पितळात आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यात दिवाळी साजरी होत असतानाच नगरच्या दुर्घटनेने आनंद होरपळून खाक झाला आहे. नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास शनिवारी आग लागली. त्यात 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. आता घटना घडल्यानंतर केवळ अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा, असा खडा सवाल त्यांनी दोन्ही सरकारांना विचारला आहे.
नगरच्या इस्पितळात आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यासाठी निमित्त शॉर्टसर्किट ठरले असले तरी आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ आता तरी थांबायला हवी. अर्थात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचीही जबाबदारी आहे. सध्या मरण स्वस्त झाले हे मान्य, पण ते इतके अमानुष व क्रूर असावे? सरकारने आता फक्त अश्रू ढाळू नयेत. हे पुनः पुन्हा घडू नये यासाठी काय ठोस पावले उचलणार ते फक्त सांगा, असा सवाल केंद्र आणि राज्य सरकारला राऊत यांनी विचारला आहे.
नगरची आग म्हणे शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता कक्षाचे फायर ऑडिट करण्यात आले होते अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली आहे. तरीही रुग्णांचा मृत्यू हा गुदमरून झाला की होरपळून झाला हे तपासून पाहू असे सांगण्यात आले. मृत्यू जळून झाला की गुदमरून, हे जरूर तपासा, पण मृत्यू इस्पितळास आग लागल्यामुळेच झाला व जनतेचे रक्षण, संरक्षण करणे हे कोणत्याही सरकारचेच कर्तव्य असते.
या ठिकाणी आग का भडकली याची विविध कारणे आता समोर येत आहेत. अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर्स ही पीएम केअर्स फंडातून देण्यात आली होती. ती निकृष्ट दर्जाची होती व त्यामुळेच शॉर्टसर्किट झाले असावे असा संशय आमदार रोहित पवार यांना आहे. आग कशाने लागली व भडकली या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत.
Read Also :
-
“क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?” नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
-
भाजपने सरकारी कंपन्यांप्रमाणे तपासयंत्रणा आणि तुरुंगांचेही खासगीकरण केलेय;…
-
‘‘कोरोनाची लस मी घेतली नाही आणि घेणारही नाही’’; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे…
-
नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; 35 खेळाडू ठरले अर्जुन…