महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई हल्ला..!

मुंबई: बेळगाव अधिवेशनाला विरोध करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर बेळगावमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये याविरोधात तीव्र संताप व्यक होत आहे. महामेळाव्यादरमयान घडलेल्या घटनेमुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या बेळगावमधील अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताचा विरोध आहे. त्यामुळे या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये महामेळाव्याचे आजोजन करण्यात आले होते. यावेळी कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केली. दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतान दिसत आहे.

कर्नाटक विधानसभेच्या बेळगावमधील अधिवेशनाला सुरूवातीपासूनच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताचा विरोध होता. दरम्यान अधिवेशनाच्या दिवशी घडलेल्या या प्रकरणामुळे मराठी भाषिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असून ठाकरे कुटुंबियांनी सुरूवातीपासूनच मराठीचा मुद्द्याला धरून ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केल्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते यावर लक्ष लागले आहे.