विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप

पुणे: पुण्यातील सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिर हे प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
आज आषाढी एकादशी निमित्त आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंहगड रोड येथील विठ्ठल मंदिरात जाऊन विठूरायांचे दर्शन घेतले.
त्यावेळी त्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करुन विठूरायाच्या चरणी सेवा अर्पण केली.
स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते यावेळी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या समवेत आमदार भिमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.