कामगार आघाडीने आपले संघठन मजबूत करून पक्षाचे काम वाढविले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

12
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या संघठन वाढीसाठी वेगवेगळ्या आघाड्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे.‌ पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्याचा विस्तार यासाठी आज पुणे येथे भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या नवनियुक्त पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कामगार आघाडीने आपले संघठन मजबूत करून पक्षाचे काम वाढविले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगारांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे. त्याचे लोकार्पण १९ जानेवारी रोजी माननीय मोदीजींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास देखील कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे निमंत्रण देखील पाटील यांनी यावेळी दिले.
कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव बाळासाहेब टेमकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी,  आमदार भीमराव तापकीर ,  यांच्यासह भाजपा कामगार आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.