‘लोकमत हेल्थ एक्स्पो २०२६’ ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट; स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकमत समूहाचे कौतुक

6

पुणे : बदलत्या जीवनशैलीमध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची, फिटनेसची आणि पोषणाची काळजी कशी घ्यावी, याचे उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या ‘लोकमत हेल्थ एक्स्पो २०२६’ ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली. लोकमत समूहाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण एक्स्पोमध्ये त्यांनी आरोग्य, फिटनेस, पोषण, आधुनिक वैद्यकीय सेवा आणि वेलनेसशी संबंधित विविध दालनांची पाहणी केली.

या भेटीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक्स्पोमधील नाविन्यपूर्ण प्रदर्शनांना भेट देऊन, तिथे सहभागी झालेल्या विविध आरोग्यविषयक स्टॉल्सची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदर्शकांनी मांडलेल्या आधुनिक व आरोग्यदायी संकल्पनांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने नागरिकांमध्ये मोठी जनजागृती घडवून आणतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आरोग्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि सजगता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमत समूहाचे मनापासून कौतुक केले व या संपूर्ण एक्स्पोला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.