कोथरूडमध्ये ‘आरोग्य वारी’च्या फिरत्या दवाखान्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन; नगरसेविका रेश्मा बराटे आणि लहु बालवडकर यांचा स्तुत्य उपक्रम

7

पुणे : आषाढी वारीमध्ये लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना, या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुण्यात एक उत्तम उपक्रम राबवला जात आहे. वारीत सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी नगरसेविका रेश्मा बराटे आणि भाजप नेते लहु बालवडकर यांच्या वतीने ‘आरोग्य वारी’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कोथरूड येथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या फिरत्या दवाखान्याचे (Mobile Clinic) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर तो वारीच्या मार्गावर रवाना करण्यात आला. हा फिरता दवाखाना वारीदरम्यान वारकऱ्यांना जागेवरच तातडीने वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार मोफत पुरवणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या संवेदनशील उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.