पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर पुढील काळाचा विचार करुन नागरी सुविधांचे नियोजन करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

7

सोलापूर, १४ जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातील ‘रे नगर’ येथे दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर रे नगर येथील प्रकल्पाचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन सदर प्रकल्पाची आणि कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा कार्यक्रम योग्य पद्धतीने नियोजनबद्ध व्हावा, तसेच प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर पुढील काळाचा विचार करुन नागरी सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, यावेळी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन त्यांनी देखील जलपूजन केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खासगी सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, महापालिका आयुक्त शीतल तेली- उलगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, ग्रामीणचे शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.