रे नगर गृह प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक हात दिवसरात्र परिश्रम घेत होते, त्या सर्वांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन

17

सोलापूर: श्रमिकांसाठी देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असलेल्या रे नगरमधील घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झाले. या कार्यक्रमाची सर्वत्र मोठी चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक हात दिवसरात्र परिश्रम घेत होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या सर्वांचे अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पालकमंत्री या नात्याने सोलापुरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रे नगर प्रकल्पातील महत्वपूर्ण व्यक्तींची भेट घेतली. मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाले होते. त्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली होती. एका अनौपचारिक कार्यक्रमात पाटील यांनी यातील काहींचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली- उलगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सह सर्व शासकीय आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.