पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व गावकऱ्यांचा गौरव

2
सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी येथे आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, अमृत महाआवास अभियान पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आले . या सोहळ्या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व गावकऱ्यांचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना गाव-खेड्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे काम केले जात आहे. तरी, ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.