लोकसभेच्या पुणे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

9

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांनी शिवाजीनगर तसेच पर्वती मतदार संघातील महायुतीची समन्वय बैठक घेतली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीची समन्वय बैठक झाली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवाजीनगरमधील महायुतीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान पाटील यांनी पर्वती मतदारसंघातील महायुतीतील घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक देखील घेतली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गंगा घरोघरी पोहचवली आहे. हाच विकास निरंतर पुढे जात राहण्यासाठी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.