इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा; महाविद्यालयांमध्ये ‘समुपदेशन केंद्रे’ सुरू करण्यावर भर!

9

पुणे : पुणे येथील नामांकित इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ३३ व्या आणि स्वायत्त विद्यापीठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी संस्थेच्या आजवरच्या शैक्षणिक प्रवासाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठीही सदिच्छा व्यक्त केल्या.

शिक्षणात आधुनिकता आणि नाविन्य आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) मोठा फायदा होत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. “नवीन धोरणातील स्वायत्त विद्यापीठे (Autonomous Universities) आणि ‘स्मॉल युनिट्स’ (लघु शैक्षणिक घटक) ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

सध्याच्या आव्हानात्मक काळात विद्यार्थ्यांच्या मनातील वाढती असुरक्षितता दूर करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्वतंत्र समुपदेशन केंद्रे सुरू करणे, इंडस्ट्रीची नफाक्षमता वाढवणे आणि त्याचसोबत विद्यार्थ्यांना श्रमाच्या प्रतिष्ठेची जाणीव करून देणे गरजेचे आहे, अशी महत्त्वपूर्ण भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमास नगरसेवक राहुल कलाटे, कुलपती डॉ. तरिता शंकर, चेतन वाकळकर, सरिता वाकळकर, वसंत म्हसके, बाबाराव जाधवराव व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.